पुणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकारात्मक बदल गरजेचे

CD

मंचर, ता. २६ : ‘‘हृदयविकार हा आरोग्याचा गंभीर मुद्दा बनला आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त औषधं नव्हे, तर जीवनशैलीतील सकारात्मक बदलही तितकेच गरजेचे आहेत. अतिताणामुळे आपल्याकडे ३० ते ५० वयोगटातील नागरिकांना हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वांनी हृदयाची काळजी घ्यावी,’’ असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हसमुख गुजर यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०२५ आयोजित लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी शुक्रवारी (ता. २६) रात्री ‘वाढते हृदयविकार व वैद्यकीय उपचार पद्धती’ या विषयावर डॉ. गुजर बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. अध्यक्षस्थानी लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले होते. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक जे. के. थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम, दत्ता थोरात, उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, संजय थोरात, राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, बाजीराव मोरडे, अश्विनी शेटे आदी उपस्थित होत्या.
कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक; तर व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी सूत्रसंचालन केले.

दररोज किमान ३० मिनिटांचा व्यायाम करवा. चालणे, सायकल चालवणे किंवा योगासारखे सौम्य व्यायाम हृदयासाठी फायदेशीर आहेत. ताज्या फळभाज्या, संपूर्ण धान्ये, कमी साखर व मीठ यांचा समावेश असलेला आहार हृदयाचे आरोग्य राखतो. धूम्रपान व मद्यपान टाळा. या सवयी हृदयावर घातक परिणाम करतात.
- डॉ. हसमुख गुजर, हृदयरोग तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT