पुणे

‘ऑरम अॅवेन्यू’चा सादरीकरण सोहळा

CD

मंचर, ता.११ : मंचर (ता.आंबेगाव) येथून हाकेच्या अंतरावर पूजन डेव्हलपर्स यांच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या ‘ऑरम अॅवेन्यू’ या निसर्गरम्य व अत्याधुनिक सुविधांनी युक्त गृहप्रकल्पाचे भूमिपूजन व माहिती सादरीकरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले, “ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचा गृहप्रकल्प असून आंबेगाव तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा ठरेल.”

या प्रसंगी पूजन डेव्हलपर्सतर्फे पाच एकर क्षेत्रात ३१४ सदनिकांची सविस्तर माहिती चित्रफीत व डेमो प्लॉटच्या माध्यमातून देण्यात आली. कार्यक्रमात ५० जणांनी सदनिकांचे बुकिंग करून प्रकल्पावरील विश्वास व्यक्त केला.
यावेळी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, पूजन डेव्हलपर्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा, संचालक प्रीतम शहा, प्रीती शहा, नेत्रा शहा, शताब्दी शहा, अक्षाली शहा, पूजन शहा व स्तवन शहा आदी मान्यवर उपस्थित होते. आढळराव पाटील यांनीही प्रकल्पाचे कौतुक करत शहा कुटुंबाचे अभिनंदन केले.

यावेळी प्रीतम शहा म्हणाले, “बँगलोर-मुंबई सारख्या शहरांप्रमाणे उत्तम सुविधा असलेले हक्काचे घर ग्रामीण भागातील कुटुंबांना योग्य बाजारभावात मिळावे, यासाठी या प्रकल्पाची संकल्पना राबवली आहे. येथे जिम, सिंगापूर येथील साइट कनसेप्ट यांच्या माध्यमातून विविध प्रकारची २० उद्याने, खुले चित्रपटगृह, बॅडमिंटन कोर्ट, कॉफी शॉप, पक्षीनिवारा केंद्र, सौरऊर्जा प्रणाली, जॉगिंग ट्रॅक, दोन सभागृह, माउंटन ट्रेल, हाय-टेक २४ तास सुरक्षा व २४ तास पाणी अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.”

दरम्यान, हर्षवी गांधी, सुमित महाजन, आनंदराव शिंदे, सानिका कालेकर, पोर्णिमा सुर्वे, अशोक निघोट, विकास भोर व जगदीश पवार यांनी व्यवस्था पाहिली.

ऑरम अॅवेन्यूचा वास्तूप्रकल्प आराखडा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बेंगळुरू स्थित ‘कलीग आर्किटेक्चर स्टुडिओ’ कंपनीने केले असून देखरेख वास्तुविशारद हेमंत पाटील करत आहेत. २२ महिन्यांत सदनिकांचा ताबा मिळणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाजवळ व मंचरपासून जवळ असल्याने हा प्रकल्प पुणे, मुंबई व नाशिक परिसरात नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे.
- देवेंद्र शहा, अध्यक्ष, पूजन डेव्हलपर्स.

13185

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT