पुणे

उन्हाळी बाजरीच्या पिकास फुटले कोंब

CD

मंचर, ता.२६ : आंबेगाव तालुक्यात श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, सुलतानपूर, मंचर, वाळूंजवाडी, एकलहरे, अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, चांडोली खुर्द व पूर्व भाग अशा एकूण ४० गावात अवकाळी पावसाने कहरच केला. उन्हाळी बाजरी पीक काढण्यासाठी पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे कणसांना कोंब फुटले आहेत.

आंबेगावातील क्षेत्र वडगाव काशिंबेग भागात तीन हजार ७५० एकर क्षेत्रातील बाजरी पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी अंदाजे २० टक्के शेतात उभे असलेले एकूण ७५० एकर क्षेत्रातील बाजरी पीक वाया गेले आहे. एक कोटी ६५ लाख रुपये रक्कमेचे नुकसान शेतकऱ्यांचे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आंबेगाव तालुक्यात घोडेगाव पासून पूर्व भागात उन्हाळ्यात बाजरी पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात या पिकाचा उपयोग धान्य व गुरांच्या खाद्यासाठी होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात बाजरीची पेरणी करतात. बाजरी पिकाची जोमदार वाढ झाली होती. एकरी दीड टन बाजरीचे सरासरी उत्पादन होते. तसेच दुभत्या गुरांसाठी हा चारा उपयुक्त होतो.

दरम्यान, महसूल खात्याने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, अशी मागणी आदर्शगाव गावडेवाडीचे माजी सरपंच देवराम गावडे व संतोष गावडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दहा ते बारा दिवसांपूर्वी बाजरी पिकाची काढणी करण्याचा निर्णय या भागातील शेतकऱ्यांनी घेतला होता. पण दररोज पडत असलेल्या पावसाने बाजरीची काढणी काढता आली नाही. बाजरी पिकाला कोंब फुटले आहेत. पावसामुळे ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरांसाठी अन्य शेतकऱ्यांकडून विकत चार घ्यावा लागेल.
- महादू शिंदे, बाजरी उत्पादक, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग
13282

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT