मंचर, ता. ११ : मंचर (ता. आंबेगाव) शहरात मंगळवारी (ता. १०) भरदुपारी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मोटारीची काच फोडून एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी अशोक अर्जुन थोरात (रा. लौकी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बुधवारी (ता. ११) संध्याकाळी तक्रार ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेतली आहे आहे.
थोरात हे मक्याचे व्यापारी आहेत. काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मक्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी मंचर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून मंगळवारी एक लाख रुपये रक्कम काढली होती. सदर रक्कम त्यांनी पिशवीत ठेवून ईरटीका मोटारीच्या डाव्या बाजूच्या मागील सीटवर ठेवली होती. जवळच असलेल्या मातोश्री हार्डवेअर येथे ते गेले. तेथे त्यांनी मोटार जुन्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यांचा मुलगा आयुष हा काही कामानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेला. काही वेळाने परत आलेल्या आयुषने पाहिले असता मोटारीची मागील सीटच्या बाजूची काच फोडलेली होती. पिशवीसह रक्कम चोरीला गेले होते. त्यांनी तातडीने वडील अशोक यांना माहिती दिली घटनास्थळी थोडा वेळ थांबून परिसरात शोध घेतला असता रक्कम मिळाली नाही.
या प्रकरणी बुधवारी मंचर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिस नाईक जी. ए. डावखर यांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक राधा वायाळ पुढील तपास करत आहे.
दरम्यान, या भागात पूर्वी मंचर ग्रामपंचायतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे आढळून आले. मंचर नगरपंचायतीने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू करावेत, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, दररोज दिवसाही साध्या वेशातील पोलिसांची गस्त बँका व बाजार पेठ परिसरात सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.