पुणे

मंचरमधील सराईत गुन्हेगार पवन थोरात स्थानबद्ध

CD

मंचर, ता. ११ : मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खून करण्याचा प्रयत्न, खंडणी, गर्दी जमवून मारामारी, अपहरण, अवैद्य वाळू चोरी, अवैद्य शस्त्र बाळगणे आदी बारा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला व परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पवन सुधीर थोरात (वय २५, रा. जुना चांडोली रस्ता, मंचर, ता. आंबेगाव) याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मंचर पोलिसांनी आरोपी थोरातला नागपूर कारागृहात जमा केले आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
कंकाळ यांनी सांगितले की, चर पोलिस ठाण्यात व खेड पोलिस ठाण्यात यापूर्वी थोरात याच्या विरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला वेळोवेळी विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटकही केली आहे. परंतु त्याच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही. सामान्य लोक, व्यापारी, उद्योजक यांच्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण झाली होती. त्याच्यावर वेळीच कायद्याचे बंधन राहावे. तसेच, त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी त्याला कारागृहात स्थानबद्ध करणे गरजेचे होते. यासंदर्भात मंचर पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी थोरात याच्या विरोधात आदेश पारित केले आहेत. हवालदार संजय नाडेकर, शेखर भोईर, प्रणय कुमार उकिरडे, नंदकुमार अढारी, शरद फुलवडे, अजित पवार, योगेश रोडे या पोलिस पथकाने गुन्हेगार थोरात याला स्थानबद्ध करून नागपूर कारागृहात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT