पुणे

पावसामुळे तरकारीच्या तोडणीवर परिणाम

CD

मंचर, ता. १५ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १३) फ्लॉवरला प्रती किलोला तीस रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला. दोन महिन्यात प्रथमच फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळत असल्याने फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चार हजार १०२ फ्लॉवर डागांची आवक झाली. प्रती किलो गवार व घेवड्यालाही ११० रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
सध्या पाऊस पडत असल्याने तरकारी मालाच्या तोडणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तरकारी मालाची आवक घटली आहे. रविवारी एकूण ११ हजार ९७५ तरकारी डागांची आवक झाली. आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर व शिरूर या तालुक्यांतून तरकारी मालाची आवक झाली. फ्लॉवरला दहा किलोला १५५ रुपये ते ३०१ रुपये बाजारभाव मिळाला. येथे लिलाव पद्धतीनंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन, बाजारभाव आणि एकूण रकमेची माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर कळवली जात असल्याचे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

शेतमालाचे नाव आणि बाजारभाव
कारले : ३१५-५५०, गवार : ५६०-एक हजार १००, घेवडा : ७००-एक हजार १००, चवळी ३००-५५०, ढोबळी मिरची : ३७०-७००, भेंडी : ३४०-६५१, फरशी : ५००-एक हजार एक, भुईमूग शेंगा : २००-७००, दोडका : ३५०-६५०, मिरची : ५०५-८६०, तोंडली : ३७०-६००, लिंबू : १००-३००, काकडी : २८०-५५०, कोबी : ८५-१५०, वांगी : ४२५-७००, दुधी भोपळा : १९०-३५०, बीट : १६०-३००, आले : २१०-३२०, टोमॅटो : २५०-४६०, मका : १२०-२००, पावटा : ७५०-९००, डांगर भोपळा : ४०-९०, वालवड : एक हजार १००, राजमा : एक हजार १२०, पापडी ७००, बटाटा : १५०, शेवगा : ५००-७००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT