पुणे

मंचरला भंगार व्यावसायिकांना सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश

CD

मंचर, ता.१५ : मंचर शहर व परिसरातील सर्व भंगार व्यावसायिकांनी दुकानाच्या सभोवती सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवून घ्यावेत. तसेच दुकानाला भंगार साहित्य देणाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांकाची नोंदवही तयार करून अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आदेश मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिले.
मंचर (ता.आंबेगाव) पोलिस ठाण्यात भंगार व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत कंकाळ बोलत होते. शेतकऱ्यांचे कृषीपंप, विजेच्या वाहिन्या आदि साहित्य चोरीच्या घटना वारंवार परिसरात घडत आहेत. सदर साहित्यांची खरेदी काही भंगार व्यावसायिक करतात. अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कंकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कंकाळ म्हणाले, याबाबत तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रात्रीची गस्त वाढवली आहे. भंगार दुकानदारांच्या दुकानातील साहित्याची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे कामही सुरु आहे.
...........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT