पुणे

आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

CD

मंचर, ता. २१ : ‘‘राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथील आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती शुक्रवारी (ता.२५) सकाळी दहा वाजता होणार आहेत, अशी माहिती मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सागर मोहिते यांनी दिली.
यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइट पोर्टलवर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. हे प्रशिक्षण १८ ते ३८ वयोगटातील इयत्ता १०वी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे. कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत मंचर येथील आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आतापर्यंत २ हजार ९८५ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना रोजगार मिळाला आहे. आदिवासी युवक व युवतींनी या मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (०२१३३, २२३०८१) येथे संपर्क साधावा, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत दरमहा उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचे हे ११३ वे सत्र १ ऑगस्टला सुरू होणार आहे. यात उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय, निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो.
- सागर मोहिते, प्रमुख, मार्गदर्शन केंद्र मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात उभारणार प्रशस्‍त वाहनतळ: शिवेंद्रराजे; राजवाडा परिसरात २५० वाहनांसाठी होणार सोय

India Badminton: भारताचे सहा बॅडमिंटनपटू अपात्र; व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका, जागतिक विद्यापीठ स्पर्धेला मुकले

धक्कादायक प्रकार! 'साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावले'; एकतर्फी प्रेमातून हल्ला, युवकाला चोप अन्..

Chandrashekhar Bawankule: ‘हनीट्रॅप’मधील मंत्र्यांबाबत त्यांनाच विचारा: चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT