पुणे

मंचरमधील पांडवकालीन तपनेश्वर शिवमंदिर

CD

मंचर, ता. २६ : श्रावण सोमवारनिमित्त मंचर (ता.आंबेगाव) येथे पांडवकालीन तपनेश्वर शिवमंदिर श्रद्धा, अध्यात्म व परंपरेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर मंदिर असल्याने पंचक्रोशीसह देशाच्या विविध भागातून हजारो शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात. देवस्थान ट्रस्टमार्फत पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात.

मंदिरातील शिवलिंग स्वयंसिद्ध मानले जाते. दर सोमवारी येथे जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेल अर्पण यांसारखे धार्मिक विधी श्रद्धेने पार पडत आहेत.
गेल्या २० वर्षांपासून श्रावण महिन्यात दर सोमवारी अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर व त्यांचे सहकारी भक्तांसाठी मोफत उपवासाचे पदार्थ, पाणी व फळे वाटप करतात. येथे पार्किंग व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असते.

देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी रुद्राभिषेक, भजन-कीर्तन, पारायण व वृक्षारोपण सारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची सोमवारी चहा, नाश्ता व्यवस्था केली जाते. धर्मशाळेत भाविकांची मोफत निवासी व्यवस्था केली जाते.
- जालिंदर बिबवे, अध्यक्ष, तपनेश्वर मंदिर ट्रस्ट मंचर

मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तपनेश्वर मंदिर या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. रस्त्यावर विक्री करणारे व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व्यवसायिकांबाबत नगरपंचायत प्रशासनाबरोबर चर्चा करून मार्ग काढला जाईल.
- श्रीकांत कंकाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे

• मंचर पोलिस ठाणे दूरध्वनी क्रमांक :०२१३३-२२३१५९
• रुग्णवाहिका क्रमांक : १०८

13710

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT