पुणे

मंचर स्थानकातील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल

CD

मंचर, ता. २६ : येथील बसस्थानकामध्ये पावसामुळे खड्डेच- खड्डे पडले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून खड्डे बुजविण्यासाठी येथे खडीचे ढीग येऊन पडलेले आहेत. पण ते पांगविले जात नाहीत. एसटीमध्ये चढताना प्रवाशांना अनेकदा पाण्याची डबकी ओलांडावी लागतात, त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
मंचर (ता. आंबेगाव) हे पुणे- नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथे दररोज ४०० हून अधिक एसटी गाड्यांची सुरत, इंदोर, नाशिक, नंदुरबार, धुळे, बेळगाव, अक्कलकोट, संभाजीनगर, भीमाशंकर, मुंबई, ठाणे या मार्गावर ये- जा होते. सध्या श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डे व पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
डबक्यांमधून चालत गेल्याने प्रवाशांच्या कपड्यांवर गाळ उडत असून, अनेकांचे कपडे खराब होतात. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त येत्या काही दिवसांत प्रवाशांची संख्या आणखी वाढणार असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी प्रवासी वैभव बाणखेले यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.

मंचर बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम राज्यपरिवहन महामंडळाने एका ठेकेदाराला दिले आहे. त्याने खडी आणून टाकली आहे, पण पुढचे काम रेंगाळले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील राज्यपरिवहन महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करून खडे बुजविण्याची कार्यवाही केली जाईल.
-वसंतराव अरगडे, आगार प्रमुख, तांबडेमळा- मंचर

13964

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांचा मुस्लिम तरुणाची किडनी घेण्यास नकार; आरिफ खानने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला, पण...

Pune Ganesh Festival 2025 : फुले, फळांच्या खरेदीने बाजार फुलला; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरांमध्ये गर्दी

Ganesh Chaturthi 2025: आश्रमातला उपद्रवी उंदीरच बनला बाप्पाचा साथीदार; वाचा बाप्पाच्या वाहनामागची अद्भुत गोष्ट

Latest Maharashtra News Updates : दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणुकीला सुरुवात

Solapur News:'अनियमितता असलेल्यांची रद्द होणार वैयक्तिक मान्यता'; मान्यता नियमानुसार घेतल्याचे शाळांचे म्हणणे, उपसंचालकांचा सप्टेंबरमध्ये निर्णय

SCROLL FOR NEXT