पुणे

मोटारसायकलवर बिबट्याची झडप

CD

मंचर, ता. १७ : वाळूंजवाडी ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता.१७) पहाटे साडेपाचच्या सुमारास मोटरसायकलवर मागे बसलेले स्वप्नील प्रकाश दुधवडे (वय २५,रा. ठाकरवाडी) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सचिन वसंत पारधी दुचाकी चालवत होते. त्यांच्या मागे दुधवडे बसले होते. रस्त्यावर शेपूट दिसल्याने कोल्हा असावा या अंदाजाने त्यांनी मोटारसायकलची गती कमी केली. तेवढ्यात बिबट्याने झडप मारल्याने दुधवडे यांच्या पायाला जखम झाली. दोघांनीही आरडाओरड केल्याने बिबट मादी व तिचा एक बछडा तेथून निघून गेला. या घटनेची माहिती सरपंच नवनाथ वाळूंज व ग्रामस्थांना समजली. त्यांनी ताबडतोब वाळुंजवाडी ते मंचरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती केली. मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी विकास भोसले यांना ही घटना कळवली. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन पिंजरे लावले असून सर्व बिबटे जेरबंद केले जातील. नागरिकांनी प्रवास करताना तसेच लहान मुलांची व शेतात काम करणाऱ्या महिलांची काळजी घ्यावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

CJP Expansion: कॉकरोच जनता पार्टीची नवी टीम जाहीर! रांका-दास यांच्यानंतर २ नवे राष्ट्रीय प्रवक्ते कोण? कोणाला कोणती जबाबदारी?

Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आवरा; भाजप शहराध्यक्षांची सुनेत्रा पवारांकडे मागणी

Marathi News Live Updates : जळगाव पोलिसांनी मोठ्या आवाजाची निर्मिती करणाऱ्या 'मॉडिफाईड' सायलेन्सर्सविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली

Talegaon Dhamdhere News : हिंद केसरीचा मानकरी विज्या बैलाचा मृत्यू; मालकाने केला धार्मिक विधी

SCROLL FOR NEXT