मंचर, ता. २ : मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले. एकूण १७,१६४ मतदारांपैकी ६५१५ पुरुष व ६२१८ महिला, अन्य एकमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान ७४.१९ टक्के झाले. एकूण २४ मतदान केंद्र मतदानासाठी होते. विशेष म्हणजे प्रथमच वाड्या वस्त्यांवर मतदान केंद्र सुरू केल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मतदानाचा हक्क बजावणे सोयीचे झाले.
मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अंजली कुलकर्णी, आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव, वरद थोरात हे सतत मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करत होते. अकरा व बारा भागामध्ये सात वाजून ३२ मिनिटांनी दोन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी नवीन मशीनची व्यवस्था केली. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. पण त्यानंतर मतदारांची संख्या वाढत गेली. मतदान केंद्राची संख्या अधिक असल्याने केंद्रावर आल्यानंतर ताबडतोब दहा मिनिटाच्या आत मतदान करून मतदारांना बाहेर पडणे सोयीचे झाले. सखी व हिरकणी मतदान केंद्र केली होती. मतदार यादीत नाव असलेल्या एकमेव अन्य गौरी खांडेभराड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला होता. शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मतदानाची वैशिष्ट्ये
- नगराध्यक्षपद व १६ प्रभागात नगरसेवकपदांसाठी मतदान झाले.
- एकूण मतदार संख्या १७१६४ आहे. त्यामध्ये पुरुषांची संख्या ८५३१ व महिलांची संख्या ८६३२.
- सात वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७४.१९ टक्के मतदान झाले आहे.
- अकरा प्रभागात सर्वाधिक ८५ टक्के व एक प्रभागात सर्वात कमी ६४ टक्के मतदान झाले.
- मतदान केंद्रांची संख्या २४ असल्याने कोठेही दहा मिनिटापेक्षा अधिक काळ मतदारांना थांबावे लागले नाही.
- मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा व पोलीस बंदोबस्त ही पुरेशा प्रमाणात होता.
- प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली होती. पाच ठिकाणी हिरकणी कक्ष होता.
मला निवडणूक मतदानाविषयी फार उत्सुकता होती, यापूर्वी आईवडिलांबरोबर मतदान केंद्राकडे जात होती, पण मला प्रवेश दिला जात नव्हता. मला आज लोकशाहीमधील हक्काचा मतदानाचा हक्क मिळाला. मतदान केल्यानंतर मला फार आनंद झाला.
- साक्षी योगेश पटणी
महाविद्यालयामध्ये झालेल्या निवडणुकीत मतदान केले, पण सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदान कक्षात गेल्यानंतर व्यवस्थित पत्रिका पाहून आपले मत बाद होणार नाही, याची काळजी घेऊन मतदान केले. आयुष्यातील पहिले मतदान होते, आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.
- पार्थ मंगेश काळे,
मंचर शहरात अन्य मतदारांची संख्या ५० ते ६० आहे. त्यांनी नाव नोंदणी करणे गरजेचे होते, पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यांची मतदार यादीमध्ये नावे जनजागृती करणार आहे. या कामी मला प्रशासनाने सहकार्य करावे.
- गौरी खांडेभराड, अन्य मतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.