मंचर, ता. १४ : पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) येथील श्री नवखंड माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (ता. १२) व शनिवारी (ता. १३) विज्ञान, चित्रकला व रांगोळी प्रदर्शन झाले. स्काऊट-गाइडच्या विद्यार्थ्यांसाठी खरी कमाई उपक्रमांतर्गत बाजार कट्टा व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, आर्थिक व्यवहार व स्वयंरोजगाराचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले.
तसेच विज्ञान प्रदर्शनात शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, उदयोन्मुख तंत्रज्ञान, गणिती मॉडेल्स, जलसंवर्धन व जलव्यवस्थापन आदी विषयांवर ११५ प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. याप्रसंगी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर पवळे, सूर्याजी सावंत, एस. बी. वाळुंज, गंगाधर पानसरे, सुरेश अभंग, नवनाथ भालेराव, सुरेश भागडे, बाळासाहेब मनकर, सुदामराव सावंत पाटील, हनुमंत हांडे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक बाळकृष्ण हांडे, ज्ञानदेव गाडगे यांनी स्वागत, तर जालिंदर ढोले, शशिकांत रासकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निर्मला साबळे, साधना बगाटे, रोहिणी होनराव आदींनी व्यवस्था पाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.