पुणे

एसटीच्या बस थांब्याअभावी अवसरी येथे प्रवाशांची गैरसोय

CD

मंचर, ता.२४ : जुन्या पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार कार्यरत आहे. मात्र त्यालगतच्या महत्त्वाच्या अवसरी फाट्यावर अद्याप एसटीचा मान्यताप्राप्त अधिकृत थांबा नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सध्या एसटी गाड्या प्रवाशांना सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मंचर बसस्थानकात सोडत असल्याने विशेषतः आंबेगाव तालुक्यातील २५ व शिरूर तालुक्यातील २० अशा एकूण ४५ गावांतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अवसरी फाट्यावरून शिरूरपर्यंत ये-जा करणाऱ्या गावांची संख्या मोठी असून या ठिकाणी दररोज कामगार, व्यावसायिक विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. अवसरी फाट्यावरून पुणे, नाशिक, भीमाशंकर, जुन्नर, शिर्डी आदी मार्गांवरून दररोज ५०० हून अधिक एसटी गाड्या ये-जा करतात; मात्र यापैकी एकही गाडी अवसरी फाट्यावर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर अवसरी फाट्यावर सर्व एसटी गाड्यांचा अधिकृत थांबा मंजूर करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जगदीश अभंग यांनी केली आहे. मागणीची त्वरित दखल न घेतल्यास प्रवाशांना आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

14866

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: "बिचारे देव मतदान करू शकत नाही, म्हणून..."; उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले, काय आहे प्रकरण?

Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार; ‘हे’ आहे कारण, महावितरणकडून ग्राहकांना इशारा, वाचा...

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

SCROLL FOR NEXT