पुणे

आंबेगावमधील नागरिकांना मिळणार दाखले

CD

मंचर, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता. ७) ते शनिवारी (ता. ९ मे ) या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या समाधान शिबिरांचे वेळापत्रक तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी जाहीर केले आहे.

शिबिरांमध्ये भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे, ७/१२ उतारे वितरित करणे, ‘जिवंत ७/१२’ मोहीम राबविणे, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे अर्ज स्वीकारणे व मंजुरी आदेश देणे, फेरफार प्रकरणे निकाली काढणे, तसेच उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र आदी दाखले वितरित करण्यात येणार आहेत.

यावेळी वाघ म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत अभियान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्यात विविध मंडलांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन केले आहे. सर्व शिबिरे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहेत.
दरम्यान डॉ. वाघ यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

मंडलनिहाय शिबिरांचे वेळापत्रक
आंबेगाव मंडल.......७ मार्च व १० एप्रिल
घोडेगाव मंडल.......९ मार्च व ११ एप्रिल
मंचर मंडल.......१० मार्च व १३ एप्रिल
कळंब मंडल.......११ मार्च व ५ एप्रिल
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक मंडल.......१२ मार्च व १६ एप्रिल
निरगुडसर मंडल.......१३ मार्च व ७ एप्रिल
मंचर नगरपंचायत.......९ मे २०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

SCROLL FOR NEXT