मंचर, ता. २८ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार किशोर बाबाजी हुले (वय ३२, रा. लांडेवाडी-पिंगळवाडी, ता. आंबेगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या समवेत असलेला अगस्त्य किशोर हुले (वय २) किरकोळ जखमी झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२. ३० वाजता मंचर ते भीमाशंकर मार्गावरील लांडेवाडी हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला. पिकपचालक अनिकेत दिनकर साबळे (वय २८, रा. लांडेवाडी) हा पिकअप (क्र. एमएच १६ एई २९९१) मंचरकडून घोडेगावकडे भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्यावेळी घोडेगावकडून मंचरकडे येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच १४ जे क्यू ५४७९) त्याने जोरदार धडक दिली. याप्रकरणी सुरज बाळासाहेब हुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार गणपत डावखर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.