पुणे

पिंपळगाव -खडकीत बिबट्या जेरबंद

CD

मंचर, ता. ५ : पिंपळगाव -खडकी (ता. आंबेगाव) गावच्या लिंबाचामळा परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. ४) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळी मिळताच वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक संपत तांदळे, वनसेवक जालिंदर थोरात व किसन पोखरकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले. साधारण तीन ते साडेतीन वर्ष वयाचा हा नर बिबट्या असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले. दरम्यान, चार बिबटे एकत्रित फिरताना आढळल्याने उर्वरित तीन बिबटे परिसरात असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात आला असून भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. वन विभागाने नागरिकांना विशेषतः सायंकाळी व रात्रीच्या वेळी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT