पुणे

सभापतींना नवीन वाहनासाठी प्रयत्न करणार : वळसे पाटील

CD

मंचर, ता. १० : ‘‘नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्यासाठी असलेल्या गाड्या जुन्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापतींसाठी नवीन वाहन उपलब्ध होण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमवेत चर्चा केली जाईल,’’ अशी ग्वाही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. ९) आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी कैलासबुवा काळे व उपसभापतिपदी ज्योती प्रवीण पारधी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सभापती व उपसभापती यांनी पंचायत समिती कार्यालयात नियमित उपस्थित राहून गावनिहाय दौऱ्यांचे वेळापत्रक तयार करावे आणि ते जनतेपर्यंत पोहोचवावे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वास्तव विकासकामांवर भर द्यावा. अवास्तव मागण्या न करता स्थानिक पातळीवरील गरजा मांडाव्यात. सध्या काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असून, त्या दृष्टीने टँकर व इतर उपाययोजनांची मागणी करावी. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.’’
‘‘केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, तसेच राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी समन्वयाने काम करावे. पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षणाची सोय करावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी व प्रांत यांनी आमदार व इतर लोकप्रतिनिधीप्रमाणेच सभापती-उपसभापतींना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांच्या कामांना गती द्यावी,’’ अशी सूचना वळसे पाटील यांनी केली.
यावेळी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार डॉ. सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे व विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सुभाषराव मोरमारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT