पुणे

हिंदू नववर्षानिमित्त मंचरमध्ये मिरवणूक

CD

मंचर, ता. १४ : ‘‘हिंदू नववर्ष व गुढीपाडवा सणानिमित्त मंचर शहरात गुरुवारी (ता. १९) दुपारी चार वाजता मिरवणुकीचे आयोजन केले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वहिनी आंबेगाव तालुका तसेच विविध संलग्न संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, मिरवणुकीचे २२वे वर्ष आहे. मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे,’’ असे विश्व हिंदू परिषद (मंचर) अखंड मंत्री चैतन्य महाराज यांनी माहिती दिली.
बाजारपेठेतील श्रीराम मंदिरापासून मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. यात हिंदू धर्मावर आधारित विविध धार्मिक व सांस्कृतिक चित्ररथ तसेच महापुरुषांचे चित्ररथ आकर्षण ठरणार आहेत.
चावडी चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळगाव फाटा तसेच धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले मार्गावरून मार्गक्रमण करत मिरवणूक रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचेल. त्यानंतर येथे धर्मसभेचे आयोजन केले आहे. या धर्मसभेस सनातन महासंघाचे संस्थापक डॉ. गौतमजी खट्टर मार्गदर्शन करणार आहेत.
या मिरवणुकीत सर्व हिंदू बांधव, माता व भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद मंचर प्रखंड मंत्री चैतन्य महाजन व शहर मंत्री आश्विन बढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, लोकल २० मिनिटे उशिरा

UP Police: एक लाख पोलिसांची मेगाभरती! CM योगींची मोठी घोषणा; एकाच वर्षात लाखो तरुणांना मिळणार खाकी वर्दीची संधी!

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT