पुणे

भिकोबानगर येथील सागर बनला अधिकारी

CD

माळेगाव, ता.३१ : एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस २०२१ या परीक्षेमध्ये भटक्या जाती क संवार्गातून भिकोबानगर (ता.बारामती) येथील सागर ज्ञानदेव कोकरे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे प्रशासनात उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न सागर त्याने साकार केले.

सागरने मिळविल्या यशाचे पणदरे, धुमाळवाडी, पवईमाळ, मानाजीनगर, अहिल्यानगर, सोनकसवाडी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. सागर यांचे वडील ज्ञानदेव कोकरे हे आनंद विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी मुलगा सागर याच्यासह गावातील अनेक मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच गावात सागर कोकरे यांच्यासह अनेक मुले विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत.
दरम्यान, भिकोबानगर येथील नव्याने क्लासवन अधिकारी झालेले सागर ज्ञानदेव कोकरे यांचे शिक्षण विठ्ठल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय-भिकोबानगर येथे झाले. सागर २०२० मधील एमपीएससीची मुख्य परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. यावेळी त्यास मुलाखतीस ५० पैकी फक्त १८ गुण मिळाल्याने अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र निराश न होता सागरने जिद्दीने नियमितपणे अभ्यास केला. २०२१ या परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
......
01706

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT