माळेगाव, ता. १० : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ या हंगामात गळीत केलेल्या उसापोटी सभासदांना एकूण ३४५० रुपये अंतिम ऊस दर देण्याचे जाहीर केले, तर गेटकेनधारकांना ३२०० रुपये प्रतिटन इतका अंतिम ऊस दर देण्याचे निश्चित झाले. या अगोदर सभासदांना ३३३२ रुपये प्रतिटन दिले होते, तर गेटकेनधारकांना ३१२५ रुपये दिले आहे. त्यानुसार सभासदांना उर्वरित प्रतिटन ११८ रुपये, तर गेटकेनधारकांना उर्वरित प्रतिटन ७५ रुपये लवकरच त्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग होतील, अशी माहिती कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी दिली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या साखर कामगारांनाही यंदा २० टक्के बोनस देणार असल्याचेही सांगितले.
माळेगाव कारखाना प्रशासनाने गतवर्षीच्या हंगामात ११ लाख २१ हजार ७६ टन उसाचे गाळप केले होते. त्यावेळी उसाला ११.९४८ टक्के रिकव्हरी मिळाली होती. तसेच, साखर विक्रीचा सरासरी दर ३ हजार ५४३ रुपये इतका मिळाला होता. त्यानुसार सभासदांना याआगोदर ३३३२ रुपये प्रतिटन अॅडव्हान्स दिला आहे, तर गेटकेनधारकांना ३१२५ रुपये दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) गतवर्षी गाळप झालेल्या उसापोटी अंतिम बिल जाहीर करणे, साखर कामगारांचा बोनस निश्चित करणे आदी विषयांच्या अनुषंगाने संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी उपाध्यक्षा संगीता कोकरे पत्रकारांशी बोलत होत्या. या बैठकीला कारखान्याचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आॅनलाईन उपस्थित होते.
संगीता कोकरे म्हणाल्या, ‘‘माळेगाव कारखाना प्रशासनाने १ ते १५ मार्च २०२५च्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट प्रतिटन ३१३२ रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले होते. ३१३२ ही रक्कम एफआरपीपेक्षा (एकरकमी रास्त व किफायतशीर दर) अधिकची होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफआरपी एकरकमी देण्याबाबतचा केलेला आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम माळेगाव कारखान्याने स्वीकारला होता. त्यानंतरच्या कालावधीत तत्कालिन सत्ताधारी संचालक मंडळाने सभासदांना दोनशे रुपये प्रतिटन खडकी पेमेंट दिले होते. खोडके पेमेंटचे प्रतिटन दोनशे रुपये विचारात घेता आजवर सभासदांना एकूण ३३३२ रुपये अॅडव्हान्स दिला होता. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाचा विचार करून प्रशासनाने गतवर्षीच्या उसाला अंतिम दर ३४५० रुपये प्रतिटन जाहीर केला. याशिवाय खोडवा उसाला ३४५० अधिक दिडशे रुपये अनुदानापोटी दिले जाणार आहेत. तसेच, गटकेनधारकांनाही ३२०० रुपये अंतिम दर मिळणार आहे.’’
यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
‘केंद्राच्या योजनेचा लाभ मिळणार’
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील १५ सहकारी साखर कारखान्यांवर उत्पादन वाढीच्या दृष्टीने विविध पथदर्शी प्रयोग राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये माळेगाव कारखान्याचा समावेश असावा, अशी मागणी आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत योगेश जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील १५ कारखान्यांच्या निवड प्रक्रियेत माळेगावचा प्रथम क्रमांकाने सहभाग असेल. साखर कारखाने निवडण्याची जबाबदारी अमित शहासाहेबांनी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे माळेगावचा सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.