पुणे

माळेगावातील २२ केंद्रांवर गर्दी

CD

माळेगाव, ता.२ : माळेगाव बुद्रुक (ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक अनुषंगाने मंगळवारी (ता. २) मतदानाच्या दिवशी नगराध्यक्षपदासह १८ नव्या उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद करण्यासाठी माळेगावकरांचा उत्साह चांगला दिसून आला. चुरशीच्या वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २२ केंद्रांवर सकाळी ९ नंतर गर्दी केली. साधारण ८० टक्के मतदान झाल्याची निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला सोरटे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
माळेगावात नगराध्यक्षपदासह १८ प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व जनमत विकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करून घेण्यास आग्रही होते. तर अपक्ष उमेदवारही नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी एक एक मत केंद्रस्थानी ठेवले होते. याच वेळी दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी काळजी घेतली होती. तसेच आपल्याच कार्यकर्ता अथवा गावपुढाऱ्यांकडून गद्दारी होणार नाही, या कडेही बारकाईने लक्ष ठेवले होते. ‘माळेगाव’च्या कार्य क्षेत्रातील २२ मतदान केंद्रांवरील काही ठिकाणी रांगा, तर काही ठिकाणी गर्दी पहावयास मिळाली. या प्राप्त स्थितीचा विचार करता माळेगावचा निकाल काय लागेल, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु हा निकाल २१ डिसेंबरला लागणार असल्याची बातमी दुपारनंतर समजताच बहुतांशी मतदारांमध्ये हिरमोड झाला.

मताला तीन हजार भाव
माळेगावच्या बहुतांश उमेदवारांनी मते विकत घेण्यासाठी वारेमाप पैशांचे वाटप केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात होती. मताला ३ हजार रुपयांचा भाव फुटला आणि १० रुपयांचे टोकन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रतिकूल स्थितीमुळे ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेने मात्र भल्या भल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

2978

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

अग्रलेख : ‘सूर्या’ची पिल्ले!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मार्च 2026

नीज येईना...

SCROLL FOR NEXT