माळेगाव, ता. ३ : येथील ढगाईमातानगरमधील केबल व्यावसायिक राहुल ऊर्फ पप्पू नारायण जगताप (वय ४५) यांचा गुरुवारी (ता. २) संध्याकाळी विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. वादळी पावसामुळे तुटलेली केबल दुरुस्त करताना ही दुर्दैवी घटना घडली.
माळेगाव (ता. बारामती) परिसरात गुरुवारी जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे राजे अमरसिंह कॉलनीतील केबलची वायर तुटली होती. ही वायर दुरुस्त करत असताना अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने राहुल जगताप यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी बारामतीला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज सदाशिव जेधे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
MAL26B03176
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.