पुणे

भांबर्डे एसटी पूर्ववत करण्याची मागणी

CD

माले, ता. ११ : मुळशी धरण भागातील स्‍वारगेट-शेडाणी-कुंभेरी-देवघर-आंबवणे मार्गे भांबर्डे (घुटके मुक्‍कामी) जाणारी मुक्‍कामी एसटी सुरू करण्याची मागणी ग्रामस्‍थांमधून होत आहे. रस्‍त्‍याची दुरवस्‍था, अतिवृष्‍टीमुळे वाहून गेलेल्‍या मोऱ्या यामुळे रस्‍ता नादुरुस्‍त होऊन एसटी सेवा बंद झाली होती. सध्या मोऱ्यांचे काम पूर्ण झाल्‍यामुळे, तसेच रस्‍ता नूतनीकरण झाल्‍याने एसटी सेवा पुन्‍हा पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. याबाबत एसटी महामंडळाला नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्‍यात झालेल्‍या अतिवृष्‍टीत संभवे-शेडाणी-घुसळखांब रस्‍त्‍यावरील वळणेवाडी, सोंडकरवाडी, नानिवली, नांदिवली, वडवाथर गावाजवळ दोन अशा एकूण सहा ठिकाणी मोऱ्या वाहून गेल्‍याने वाहतूक बंद पडली होती. आमदार संग्राम थोपटे यांच्‍या माध्‍यमातून मागील वर्षी मे महिन्‍यात नवीन मोरी बांधकामांसाठी २ कोटी ४१ लाखांचा निधी उपलब्‍ध झाला. त्‍यानंतर सर्वत्र नवीन मोरी बांधकाम पूर्ण करण्‍यात आले आहे.

एसटी सेवा बंद असल्‍याने विद्यार्थी, नोकरवर्गाचे, शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्‍यामुळे भांबर्डे एसटी सुरू करण्‍याची मागणी होत आहे. एसटी वाहतुकीसाठी रस्‍ता योग्‍य असल्‍याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्‍यात आले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडून सकारात्‍मक प्रतिसाद मिळून सेवा लवकरच पूर्ववत करू असे आश्‍वासन देण्यात आले. निवेदन देताना मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे, भांबर्डेचे माजी सरपंच व शिवसेना मुळशी तालुका संघटक गोविंद सरूसे, आदींचे यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT