माले, ता. २९ : बदलत्या काळात सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात घेता गोशाळा आणि त्यातून निर्माण होणारे शेणखत व अन्य उपपदार्थ हे जमिनीचा आणि अन्नपदार्थांचा कस वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गोशाळा धार्मिक व सामाजिक दृष्ट्या परंपरा व निसर्ग जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन स्टेटस हेल्थ क्लबच्या संचालिका डॉ.सुमेधा भोसले यांनी केले.
जामगाव (ता. मुळशी) येथे चालवल्या जाणाऱ्या कपिला गोशाळेच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. वसुबारसेनिमित्त
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे यावेळी गो पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी येत्या काळात गोशाळेची व्याप्ती २०० गाईंपर्यंत वाढवून संपूर्ण गावाला जलवाहिनीद्वारे स्वयंपाकासाठी इंधन पुरवठा करण्याची योजना आहे, अशी माहिती रवींद्र आचार्य यांनी दिली.
यावेळी कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र ठोंबरे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर रवींद्र आचार्य, जामगावचे सरपंच विनोद सुर्वे, पोलिस पाटील विजय सुर्वे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे ट्रॉन्सॉफ्टेकचे संचालक सुशांत गोरे आदी उपस्थित होते.
फाउंडेशनच्या खजिनदार प्रिया बेल्हेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव आदर्श केदारी यांनी आभार मानले. सहसचिव सुहास यादव यांनी सूत्रसंचालन केले.
00975
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.