मोरगाव, ता. १४ : लोणी भापकर (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, देसाई ब्रदर्स लिमिटेड, पुण्यातील वारजे येथील केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्या पुढाकारातून अमराळे वस्ती येथील ओढा खोलीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला. ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
अमराळे वस्ती ओढ्याच्या बाजूलाच आंब्याचा मळा पाझर तलाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खोलीकरणाच्या कामाचा फायदा दीर्घकाळासाठी होणार असल्याचा विश्वास माजी सरपंच रवींद्र भापकर यांनी व्यक्त केला. येथे ओढ्याच्या दुतर्फा अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरींना खोलीकरण कामामुळे फायदा होणार आहे. ओढ्यातून निघालेला माती रुपी गाळ किंवा मुरूम कोणाला वैयक्तिक वापरासाठी घेऊन जायचा असल्यास स्वखर्चाने वाहतूक करून विना रॉयल्टी घेऊन जाण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी तर सामाजिक बांधिलकी जपत केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांनी मोफत पोकलेन यंत्र उपलब्ध करून दिली आहे. निघणाऱ्या गाळाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागाची तयारी केली आहे.
यावेळी लोणी भापकरचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, दिलीप जगदाळे, राजेंद्र अमराळे, माजी उपसरपंच नंदकुमार मदने, सचिन अमराळे, दत्तात्रेय अमराळे, करण पवार, रामभाऊ जगताप, दादा जगताप, तानाजी जगदाळे, निखिल पाटील, अविष्कार तावरे, शुभम भापकर उपस्थित होते.
‘सकाळ’विषयी कृतज्ञता व्यक्त
सामाजिक बांधिलकी जपत ‘सकाळ’सह देसाई ब्रदर्स लिमिटेड पुणे व उद्योजक विनायक वाळेकर यांनी येथील शेतकऱ्यांना ओढा खोलीकरणाच्या कामास मदत करून मदतीचा हात दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी या यंत्रणेचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
02770
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.