पुणे

जळकेवाडी येथे ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण

CD

मोरगाव, ता. ११ : मुढाळे (ता.बारामती) ग्रामपंचायतीअंतर्गत जळकेवाडी येथे सकाळ रिलिफ फंड , देसाई ब्रदर्स लिमिटेड पुणे, केशव इंजिनिअरिंग सर्व्हीसेस वारजे, ओम साई गणेश प्रतिष्ठान व लोकसहभाग यांच्यावतीने नुकताच साडे तीनशे मीटर ओढ्याचे खोलीकरण पूर्ण झाले.
वास्तविक, गेल्या अनेक वर्षांपासून गाळ साचून साचून हा ओढा पूर्णपणे जमीन दोस्त झाला होता. मात्र पावसाचे शिवारातील पाणी शिवारात अडविणे व जमिनीत मुरविणे, त्या ठिकाणचे जलस्रोत बळकट करून विहिरींना शाश्‍वत पाणी मिळवणे यासाठी शेतकऱ्यांनी येथील ओढ्याचे पुनर्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला. हा गावचा ओढा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. गेली अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची येथील खोलीकरण करण्याची मागणी होती.
ग्रामपंचायत व तनिष्का व्यासपीठ यांच्यासह शेतकरी यांच्या आग्रही मागणीमुळे सामाजिक बांधिलकी जपत सकाळ रिलिफ फंड यातून डिझेल खर्च तर केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांनी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले होते. येथील साडे तीनशे मीटर ओढ्याचे खोलीकरण झाले असून गाळ उपसा व गाळ वाहतूक या दोन्हीसाठी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
ओढ्यालगत फूटभर जमीन गेली तरी चालेल, पण खोलीकरणाचे काम परिणामकारक व दीर्घकाळ शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असे झाले पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे ओढा रुंदीकरणाचे काम चांगले झाले आहे.
येथील खोलीकरणाच्या कामामुळे ओढ्याच्या अर्धा किलो मीटर अंतरावरील विहिरींची पाण्याची पातळी उन्हाळ्यातही टिकून राहण्यास मदत होणार आहे. येथील काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे या कामाचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे येथे उर्वरित खोलीकरणही व्हावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

मॉन्सूनपूर्व पावसामुळे खोलीकरण झालेल्या ठिकाणी पहिल्याच पावसात समाधानकारक पाणीसाठा झाला असून खोलीकरणाचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रपंचाला थेट हातभार लागेल, अशी मोठी मदत या ठिकाणी खोलीकरण करणाऱ्या यंत्रणेची झाली असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे यांनी व्यक्त केले.

खोलीकरणाचे काम सातत्याने करण्याचे नियोजन
शेतीसाठी शाश्‍वत पाणी गरजेचे असून सरकारी योजना व सामाजिक संस्थांची मदत घेऊन गावात सातत्याने ओढा खोलीकरण व जलस्रोत बळकटीकरणाची कामे करण्याचे नियोजन असल्याची माहिती सरपंच जयपाल साळवे यांनी दिली. सकाळ व इतर यंत्रणेने येथे केलेल्या मदतीबद्दल शेतकरी यांच्यावतीने मुढाळे ग्रामपंचायतचे सरपंच जयपाल साळवे ग्रामपंचायत सदस्य सारिका भिसे, पांडुरंग भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT