पुणे

मोरगाव पोलिस मदत केंद्रात नियमित कर्मचाऱ्यांची मागणी

CD

मोरगाव, ता. २५ : मोरगाव (ता. बारामती) येथील पोलिस मदत केंद्रात नियमित किमान एक कर्मचारी २४ तास कार्यरत असणे आवश्यक असून, येथे विविध समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत ठेवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
वास्तविक, मोरगाव पोलिस मदत केंद्र यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र सुपा पोलिस ठाणे सुरू झाल्यानंतर भौगोलिक रचनेनुसार व अंतराच्या निकषांवरून मोरगाव पोलिस मदत केंद्राचा समावेश करण्यात आला. सुपा पोलिस ठाण्याची इमारत प्रशस्त करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी असणारी गावांची संख्या व विस्तारित भौगोलिक क्षेत्र या तुलनेतून कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे अनेक वेळा मोरगाव पोलिस मदत केंद्राचे कर्मचाऱ्यांना सुपा पोलिस ठाण्याच्या मुख्यालयातील कामकाज दिले जाते, यावेळी येथे कोणीच उपलब्ध नसते.
अनेक वेळा अपघात यासह वाद- विवाद, सामाजिक शांतता भंग होईल, असे विविध प्रकार व अवैध व्यवसाय यावर वेळीच कारवाई व उपाययोजना करण्यासाठी मोरगाव पोलिस मदत केंद्रात गरज असूनही कर्मचारी उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

४० दिवसांपासून कांदा ७ ते १० रुपये किलो कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० अनुदानाची मागणी; सोलापूर ‘एपीएमसी’त १४९२८ ट्रक कांदा विकून शेतकऱ्यांना मिळाले अवघे ११८ कोटी

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Nandurbar News : काठीच्या राजवडी होळीचे होणार जागतिक ब्रँडिंग; आदिवासी विकास मंत्र्यांनी धडगावच्या भोंगऱ्या बाजारात धरला ठेका!

SCROLL FOR NEXT