मोरगाव, ता. २ : बारामती- मोरगाव रस्त्यावर लोणी पाटी (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. १) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात जाऊन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. यासंदर्भात मोहन चंद्रकांत लोणकर (वय ५२) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी भापकर गावातील लोणी पाटी येथे लोणकर यांच्या राहत्या घराचे दार उघडे होते. घरात व आसपास कोणी नाही, याचा गैरफायदा घेऊन मोटरसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्ती घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन लंपास झाले. कपाट उघडे असल्याने व लॉकरची चावी तिथेच असल्याने हा गंभीर प्रकार घडला.
सोन्याचे दागिने व रोख १५ हजार रुपये रोख रक्कम, असा १ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा गेला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित अनोळखी गावात फिरत असतील तर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.