पुणे

मोरगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

CD

मोरगाव, ता. ४ : तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे नुकताच सुपा पोलिस ठाण्याच्या वतीने भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धडक मोहीम राबवून अवैध देशी व हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
मोरगाव सुपा रस्त्यावर असलेल्या भगतराज मस्तराज गुदडावत (वय ३२, रा. वाखारी, ता दौंड) याला बुधवारी (ता. २) दुचाकीवर कॅनमध्ये गावठी हातभट्टी दारू घेऊन जाताना पोलिसांनी पकडले. पोलिस कॉन्स्टेबल सागर अशोक वाघचौडे यांच्या फिर्यादीनुसार भगतराज गुदडावत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच घराच्या जवळील आडोशाचा आधार घेऊन देशी दारूची विक्री करत असल्याप्रकरणी हिराबाई गुलाब गायकवाड (वय ६०), संगीता सुभाष जाधव (वय ५५), वच्छला रमेश जगताप (वय ५२) यांच्यावर अवैध देशी दारू विक्री प्रकरणी कारवाई केली आहे. भरारी पथकातून पोलिस कॉन्स्टेबल अश्विनी महादेव तावरे, दीपाली शरद मोहिते, रजनी जालिंदर धायगुडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

मोरगाव हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे ग्रामसभा, मासिक सभा यामध्ये अनेक वेळा दारूबंदीचा ठराव करण्यात आला. ग्रामसभेत अवैध मार्गाने दारू विक्री करणाऱ्या महिलांनी आमचे नवीन व्यवसाय उपजीविकेचे साधन निर्माण करून व्यवसायाचे पुनर्जीवन करावे, अशी मागणी केली होती.
वास्तविक, तात्पुरत्या कारवाईनंतर हे व्यवसाय गेले अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे विक्री करणाऱ्यांबरोबर पुरवठा करणाऱ्याचा शोध लावून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याशिवाय शासनाने व स्थानिक ग्रामपंचायतीने अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे समुपदेशन करून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati Visarjan Rath: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रथ सज्ज

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

SCROLL FOR NEXT