पुणे

महाडीबीटी योजनेचा लाभ घ्या

CD

मोरगाव, ता. ८ : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर विविध प्रकारची अवजारे अनुदानावर उपलब्ध योजना सुरू असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी यांत्रिकीकरणाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करावा, असे आवाहन बारामती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके व मोरगाव मंडलचे कृषी पर्यवेक्षक बापूराव लोदाडे यांनी केले आहे.
मोरगाव, लोणी भापकर, मुर्टी भागात या योजनेमधून लकी ड्रॉद्वारे मिळालेल्या अवजारांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाडीबीटीद्वारे पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचे सर्व प्रकारची अवजारे, मळणी यंत्र कडबा कुट्टी यंत्र व इतर अवजारे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत आहेत. या योजनेअंतर्गत महाडीबीटीमध्ये शेतकऱ्यांना अवजार बँक उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अवजार बँकेमध्ये एक ट्रॅक्टर व कमीत कमी तीन अवजारांचा समावेश आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात येत असून, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना विविध प्रकारची अवजारे घेता येतात.
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी हाके म्हणाले की, ‘‘महाडीबीटी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणाकरिता शेतकऱ्यांची उप अभियान यांत्रिकीकरण योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना या तीन योजनेतून निवड होते. महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरणांमध्ये २०२५-२६ मध्ये १८ हजार २४ शेतकऱ्यांची निवड झाली असून, त्यापैकी ४ हजार ९३ इतक्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केले आहेत व आतापर्यंत १ हजार ९६० शेतकऱ्यांनी अवजारे व ट्रॅक्टर खरेदी केलेले आहे. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के व बहुभुधारक शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळते.

03451

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT