मोरगाव, ता. २७ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात लोणी भापकर, मोरगाव, मुर्टी येथे श्रीरामनवमी उत्साहात पारंपारिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांसह युवकांच्या सहभागाने श्री रामनवमी उत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मयूरेश्वर मंदिरासमोरील मुख्य बाजारपेठेत शामियानात श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन मंत्रोच्चारात पार पडले.
सकाळपासून विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळांनी भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. दुपारी १२ वाजता पारंपरिक पद्धतीने रामजन्म सोहळा झाला.
या वेळी महिलांनी पाळणा म्हणत उत्सवात रंग भरला. भाविकांनी पाळणा व श्रीरामांच्या मूर्तीवर फुलांची उधळण केली.
प्रत्येक गावात कार्यक्रमानंतर श्री रामनवमी उत्सवासाठी आलेल्या भाविकांसाठी सात्त्विक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.