पुणे

महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

CD

महाळुंगे पडवळ, ता. २८ : कळंब (ता.आंबेगाव) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.२८) सकाळी आठ वाजता महावितरण कंपनीच्या वीज वाहक तारांना कंटेनरचा धक्का लागला. यामुळे तारा एकमेकांना घासल्या. या घटनेमुळे शॉर्ट सर्किट होऊन तारा रस्त्यावर पडल्या. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि प्रवाशांना वाचविण्यात यश आले.
अवजड वाहतूक करणारे कंटेनर नारायणगावच्या दिशेने जात होता. कळंब येथील महानुभव मळ्यातील श्रीकृष्ण मंदिरासमोर विजेच्या तारांना कंटेनरचा धक्का लागला. त्यावेळी मोठा आवाज होऊन तारा रस्त्यावर कोसळल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाई गोठा, घरांजवळ तारा पडल्या होत्या. तत्काळ वीज प्रवाह बंद केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दिव्यांग कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेंद्र चिखले व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता एम. बी. मुंढे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
यावेळी अर्जुन भालेराव, संजय भालेराव, आशुतोष चिखले, दिलीप भालेराव, आदित्य भालेराव उपस्थित होते. त्यानंतर महावितरण कंपनीच्या जनमित्र संपत कानडे यांनी घटनास्थळ ताबडतोब पाहणी केली. विद्युत प्रवाह बंद केला. महामार्गावरील वाहतूक काहीवेळ थांबविण्यात आली होती. कर्मचाऱ्याने रस्त्यात पडलेल्या तारा बाजूला केल्या. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.


अवजड कंटेनरमुळे वीज वाहक तारा तुटल्या. तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याने त्या धोकादायक होत्या. ग्रामस्थांनी ताबडतोब माहिती दिल्यामुळे वेळेवर घटनास्थळी पोहोचणे व उपाय योजना करणे शक्य झाले. खांबालाही चिरा पडल्या असून तोही बदलावा लागणार आहे. महावितरण कंपनीचे जवळपास १० ते १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुरुस्तीचे काम लवकर सुरु करण्यात येईल.
- एम. बी. मुंढे, सहायक अभियंता, महावितरण

01659

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT