पुणे

भिंत खचून विहिरीत कोसळला राडारोडा

CD

महाळुंगे पडवळ, ता. २७ : साकोरे (ता.आंबेगाव) येथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने विहिरीलगतची जमीन व भिंत खचून मातीचा राडारोडा विहिरीत कोसळला. यामुळे सामूहिक विहीर गाडली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळपास २५ ते ३० फूट विहीर गाडून गेली आहे.
साकोरे ते वडगाव काशिंबेग रस्त्यालगत सुरेश महिपती मोढवे, उल्हास महिपती मोढवे, चंद्रकांत महिपती मोढवे व सुनील महिपती मोढवे यांच्या सामूहिक मालकीची विहीर आहे. मोढवे कुटुंबीयांनी गट क्रमांक २६१ मध्ये सन १९८५ मध्ये ६० फूट खोल विहीर तयार केली होती. त्यावर दगडी बांधकाम केले होते. घोडनदीपासून उत्तर बाजूला ८०० ते एक हजार फूट विहीर लांब आहे. ७० हजार रुपये किमतीच्या साडे सात अश्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत मोटारी विहिरीवर बसविण्यात आल्या होत्या.
विहिरीवरून शेतीला व घरी पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने विहिरीसभोवतालची जमीन भुसभुशीत झाली. जमिनीला चीर पडून दगडात बांधलेली विहीर ढासळली आहे.
दरम्यान, गावकामगार तलाठी नितीन चंद्रकांत माने व पंकज सातकर यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. यावेळी सरपंच अशोकराव मोढवे, कोंडीभाऊ गाडे, भरत चिखले, अनिल गाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

02521

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT