महाळुंगे पडवळ, ता. १७ : लौकी (ता. आंबेगाव) येथे शेतमजूर विलास गोविंद मधे यांच्या घरातील वायरीमध्ये शॉर्टसर्किट झाले व रविवार (ता.१६) रात्री आग लागली. यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
लौकी येथील शेतकरी सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक वसंत तुळाजी बांगर यांच्या शेतावर मधे मजूर म्हणून काम करतात. लौकीतील मधलामळा येथे डोंगराजवळ त्यांचे घर आहे. कामानिमित्त मध्ये व त्यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेले होते. रात्री घरी आल्यानंतर त्यांना घरातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश केला. तेव्हा वीजेचा बोर्ड जळत होता. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे मधे कुटुंबीय घाबरून घराबाहेर पडले. त्यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅसची टाकी बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळली. अनिल थोरात, सागर थोरात, ज्ञानेश्वर थोरात, सुदाम काळे, संदेश थोरात, राजेंद्र सुळ आदी ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला.
दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान
घरातील ३२ इंची एलसीडी टीव्ही, फ्रिज, कपाट व इतर संसार उपयोगी साहित्य जळून गेले होते. त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेमध्ये शेतमजुराचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच एकता अनिल थोरात आणि उपसरपंच मंगल विनोद थोरात यांनी केली आहे.
02894
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.