महाळुंगे पडवळ, ता.३० : चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील मावकरमळ्यात शनिवार (ता.२८) ते रविवार (ता.२९) या कालावधीत रात्री बिबट्याने उच्छाद मांडला आहे. पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्याला बिबट्याने जखमी केले आहे.. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे चांडोली बुद्रुक गावचे अध्यक्ष सुभाष विठ्ठल मावकर यांनी केली आहे.
मावकरमळ्यात किरण सुभाष मावकर, सोनाली स्वप्नील पोखरकर, विठ्ठल बाबूराव नागटीळे आणि विनायक नागटीळे यांनी रविवारी (ता.२९) रात्री आठ वाजता नारळाच्या झाडाखाली एक बछडा आणि बिबट्या बसल्याचे पाहिले. त्यांनी वडील सुभाष विठ्ठल मावकर यांना माहिती दिली. गावातून ते तत्काळ घरी आले. तोपर्यंत बिबट्या तेथेच बसून होता. आरडाओरड केल्याने बिबट्या ज्वारीच्या शेतात निघून गेला. त्यानंतर किरण हे रात्री दहा वाजता घराबाहेर आले असता घरातील अंगणात दिसला. सुभाष मावकर यांना रात्री साडे अकरा वाजता मावकरमळा ते सहानेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसलेला दिसला. तसेच कैलास दत्तात्रेय मावकर यांच्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. वनरक्षक प्रदीप औटी आणि वनसेवक जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी गुरे रात्रीच्यावेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त करणे गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास जोरात आरडाओरडा करावा. बिबट्या दिसल्यास खाली वाकू नये, बिबट्याचा पाठलाग करू नये, असे आवाहन वनपाल सोनल भालेराव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.