पुणे

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कांदा लागवडीकडे कल

CD

महाळुंगे पडवळ, ता. ८ : आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांदा लागवडीस प्रारंभ झाला आहे. मात्र, सध्या मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावत आहे. यावर मात करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कांदा लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. वेळ, पाणी आणि पैशांची बचत होत असल्याने उत्पादन खर्चातही बचत होणार आहे.

आंबेगाव तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो. कांदा साठवणुकीसाठी हवेशीर अशा कांदा चाळी देखील शेतकऱ्यांनी उभारल्या आहेत. सरासरी अर्धा एकपासून ते दहा एकर क्षेत्रात कांदा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत. नगदी पैसे मिळवून देणाऱ्या कांदा पीक आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. त्यामुळे घोडनदी, उजवा, डावा कालवा, पोटचाऱ्या व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात उन्हाळ्यातही शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे.

आंबेगाव तालुका कृषी कार्यालयाने होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कळंब, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, लौकी, महाळुंगे पडवळ, साकोरे, चांडोली बुद्रूक, थोरांदळे आदी गावातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कांदा लागवड केल्याने सारे काढणे, वावर बांधणे, शेत ओले करणे आदी कामे कमी झाली आहेत. तसेच पैशांचीही बचत होत आहे.

एक एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली आहे. त्यासाठी यांत्रिक पद्धतीने ११ हजार रुपये लागले. रेन पाइपद्वारे शेतीला पाणी दिले जात आहे. गेल्या वर्षी याच शेतात सारे काढणे, वावर बांधणे आणि २० मजुरांकडून लागवड आदींसाठी १८ हजार रुपये खर्च झाला होता. यावर्षी वेळ, मजुरी आणि पाण्याची बचत झाली आहे.
- गणेश शिवाजी थोरात, कांदा उत्पादक


- १५ हजार ५०० एकर............. आंबेगावातील लागवड क्षेत्र


दृष्टिक्षेपात
- यंत्राद्वारे एकरी लागवडीसाठी ११ हजार रुपये खर्च
- सारे काढणे, वावर बांधणे, शेत ओले करावे लागत नाही
- वेळ, पाणी आणि पैशात बचत
- एका दिवसात लागवड शक्य

03489

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT