पुणे

महाळुंगे येथील क्रशर बंद करण्याचा ठराव

CD

महाळुंगे पडवळ, ता. १८ : फुलेवाडी- महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील अतुल स्टोन क्रशर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ठराव बुधवारी (ता. १७) झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
महाळुंगे पडवळ-फुलेवाडी येथील स्टोन क्रेशर व्यवसायामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले असून, शेतीचेही नुकसान होत आहे. त्रस्त झालेल्या किरण रामचंद्र डोके, ज्ञानेश्वर नथू बनकर, प्रविण रमेश डोके, रमेश सदाशिव बनकर, श्रीकांत सोपान घोडेकर, अनंथा नथू बनकर, चंद्रकांत खंडू बनकर, ययाती दत्तात्रेय केदारी, मोहन नामदेव डोके, पोपटी कोंडाजी डोके, ईश्वर रामचंद्र डोके आदीं ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरु केले होते. त्यानुसार विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सरपंच सुजाता सचिन चासकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्याला महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. संजय ज्ञानेश्वर घोडेकर यांनी अतुल स्टोन क्रशर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ठराव मांडला. त्याला उपस्थित नागरिकांनी पाठिंबा दिला.
ग्रामसभेला उपसरपंच अलका पडवळ, माजी सरपंच अशोक डोके, सेवानिवृत्त अधिकारी नवनाथ जंबुकर, शरद सहकारी बँकेचे संचालक के. के. सैद, माजी उपसरपंच विकास पडवळ, हुतात्मा बाबू गेनु प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला आंबटकर, चंद्रकांत बंडू डोके आदी ग्रामस्थांनी चर्चेत भाग घेतला. सरपंच व उपसरपंच याच्या चालू कार्यकाळात अतुल स्टोन क्रशरला परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती सरपंच सुजाता चासकर यांनी दिली. ग्रामपंचायतीमार्फत ठरावाची प्रत पालकमंत्री, महसूलमंत्री, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले.
MPW25B03515

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT