पुणे

घोड शाखा कालव्यात डिंभे धरणातून आवर्तन

CD

महाळुंगे पडवळ, ता. २३ : हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरण) डाव्या कालव्यातून ८० क्युसेकने रविवारी (ता.२२) सकाळी साडे दहा वाजता कळंब-गणेशवाडी (ता.आंबेगाव) येथून घोड शाखा कालव्याला पाणी सोडले आहे. हे आवर्तन २५ ते ३० दिवसांचे आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नारायणगाव कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ कार्यालयातून करण्यात आले आहे.
कळंब गावचा काही भाग, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी आदी दहा गावे आणि वाडीवस्तीवरील छोटे मोठे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. सध्या १३० हून अधिक विहीर व ५० हून अधिक कूपनलिकांची पाणी पातळीत घटत आहे. त्यामुळे माजी सभापती उषा कानडे, युवक अध्यक्ष सचिन भोर, नीलेश थोरात, मंगेश थोरात, राजेंद्र थोरात, ओंकार थोरात, केतन काळे, रवींद्र थोरात, संतोष थोरात आदींनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पाटबंधारे विभागाच्या नारायणगाव येथील अधिकाऱ्यांकडे देवदत्त निकम यांनीही भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी शनिवारी (ता.२१) पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर रविवारी सकाळी कालव्याला पाणी आले आहे.

03615

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT