पुणे

नागापुरातील द्राक्षाची इंग्लड, मलेशियाला गोडी

CD

महाळुंगे पडवळ, ता. १५ : नागापुरातील (ता.आंबेगाव) तेरा एकरामधील जंबो ब्लॅक व रेड ग्लोब (बिया असलेले) जातीची द्राक्षाचे ७० टन उत्पादन घेतले आहे. युद्धजन्य परिस्थितीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी आठ दिवसांत १५ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. अविट गोडीमुळे या द्राक्षांना २०५ रुपये प्रतिकिलो उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. ही द्राक्षे इंग्लड, बांगलादेश व मलेशिया देशात निर्यात केली जात आहेत.

निकम यांना २२ वर्षांत प्रथमच चांगला बाजारभाव मिळाला आहे.
जंबो ब्लॅक जातीला १८० रुपये प्रतिकिलो तर रेड ग्लोब जातीला २०५ रुपये किलो या बाजारभाव मिळत आहेत. गोडी छाटणी पासून काढणीपर्यंत अंदाजे तीन लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता एकरी पाच लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले आहे. देवदत्त निकम यांनी मुरबाड जमिनीत निर्यातक्षम द्राक्ष बाग फुलविली आहे.

‘रेडग्लोब’ हा वाण निर्यातीसाठी चांगला आहे. त्याची टिकवणक्षमता अधिक आहे. त्यास ‘क्रॅकींग’ची समस्या नाही. काढणीनंतर शीतगृहामध्ये चार ते पाच महिने टिकते. इतर द्राक्षांच्या तुलनेत खर्चही कमी येतो. बदलत्या वातावरणाचा जास्त परिणाम होत नाही. रेड ग्लोब या वाणाविषयी पूर्वी अभ्यास कमी होता, असे निकम यांनी सांगितले.

कॅलिफोर्निया येथील यूनिवर्सिटीचे सीनियर प्रोफेसर डॉ. हर्डिन बी जॉन्स यांनी ‘रेडग्लोब’ वाणाच्या बियांवर संशोधन करून कर्करोगासारख्या आजारावर या बिया गुणकारी असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी १२० ते १३० रुपये किलो दरम्यान बाजारभाव होते. या वर्षी उत्पादन घटल्यामुळे रेड ग्लोब जातीला उच्चांकी २०५ रुपये प्रती किलोला बाजारभाव मिळत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी सांगितले.

03638

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT