पुणे

सासवड ते माळशिरस रस्ता खड्ड्यांत

CD

माळशिरस, ता. १४ : सासवड ते माळशिरस या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. यामध्ये वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागण्याबरोबरच अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंगापूर ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. खड्ड्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी उपसरपंच विक्रांत पवार, विशाल लवांडे, सौरभ लवांडे, बाळासाहेब वारे, श्रीहरी लवांडे, प्रवीण लवांडे, अशोक गोसावी, सिद्धार्थ लवांडे, रवींद्र लवांडे, रामदास लवांडे, विकास यादव, अनिकेत लवांडे, बाजीराव कोरडे, शुभम वारे, अक्षय गोसावी, राजेंद्र चव्हाण, सचिन लवांडे, अक्षय लवांडे, कार्तिक लवांडे, अमोल लवांडे आदी उपस्थित होते. सासवड माळशिरस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने सुरुवात केली होती. सासवड ते माळशिरस रोड आंबोडी, वनपुरी, उदाचिवाडी, सिंगापूर, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. रात्रीचे खड्डे दिसत नाहीत. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा निषेध नोंदविण्यासाठी सिंगापूर ग्रामस्थांनी खड्ड्यांविरोधात आंदोलन केले.


रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत व यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास यावर अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत. रस्ते पावसात खराब झाल्याने दरवर्षी रस्ते दुरुस्तीवर प्रशासन मोठा खर्च करते; परंतु ही कामे दर्जेदार होत नाहीत. रस्त्यावरील या खड्ड्यांमध्ये वाहनचालक वारंवार घसरून अपघात होत आहेत.
- विक्रांत पवार, उपसरपंच, सिंगापूर


2743, 2741

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT