पुणे

निगुडघर परिसरात गतीरोधक बसविण्याची मागणी

CD

महुडे, ता. २५ : निगुडघर (ता. भोर) येथे अपघाताचे प्रमाण वाढल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी निगुडघर देवघरच्या सरपंच मंगल कंक यांनी केली आहे.

हिरडस मावळातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निगुडघर येथे भोर महाड रस्त्याशेजारी रविवारचा आठवडे बाजार भरतो. तसेच इतर दिवशीही नीरा देवघर धरण रिंग रोड वरील गावातील, हिर्डोशी, म्हसर भागातील नागरिकांची बाजार व इतर कामासाठी वर्दळ असते. त्याचबरोबर शाळकरी मुलांचीही वर्दळ असते.


आपटी ते निगुडघर रस्त्याचे डांबरीकरण पावसापूर्वी झाल्यामुळे रस्ता चांगला झाल्याने देवघरकडून भोरकडे जाताना उताराचा रस्ता असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे निगुडघर येथे नेहमी लहान मोठे अपघात होत असतात.

अपघात टाळण्यासाठी या निगुडघर येथील चौकात दोन व प्राथमिक शाळेजवळ एक असे तीन गतिरोधक बसवून सुचनादर्शक फलक बसवावेत अशी मागणी ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एम. डब्लू. शेख, व्ही. पी.. गुजर, विद्याधर कांबळे तसेच अनिल बांदल, मारुती कंक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यातील गणेश मंडळांची बैठक सुरू

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT