पुणे

भोरमधील ६,०३० लाडक्या बहिणी वंचित

CD

महुडे, ता. ३ : भोर तालुक्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील मंजूर ५० हजार ३०४ अर्जांपैकी ४४ हजार २७४ लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वर्ग झाले असून, उर्वरित ६ हजार ३० महिलांचे आधार सिडिंग नसल्याने त्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाले नसल्याची माहिती भोरचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभधारक महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे दोन हप्ते यापूर्वीच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. लाडक्या बहिण योजनेला भोर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. भोर तालुक्यातून नारी शक्ती दूत या ॲपवरुन भरलेले २९ हजार १२७ अर्ज व पोर्टलवरून भरलेले २१ हजार १७७ अर्ज, असे एकूण ५० हजार ३०४ महिलांचे अर्ज मंजूर आहेत. यातील ४४ हजार २७४ बहिणींच्या खात्यात १५०० रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, मंजूर अर्जांपैकी ६ हजार ३०४ महिलांचे आधार सिडिंग नसल्याने त्यांचे पैसे खात्यात वर्ग करण्यात आले नाहीत. त्यांनी तातडीने आधार सिडिंग करणे गरजेचे आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा झाल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार बँक खात्यात जमा झाले आहेत. शासनाने महिलांसाठी सुरू केलेली ही योजना लाभदायक असून, ही योजना यापुढे कायमस्वरूपी सुरू ठेवावी.
- प्रमिला कुमकर, माळेवाडी- महुडे (ता. भोर)

नारीशक्ती ॲप व पोर्टलद्वारे भरलेल्या २०३ मंजूर अर्जांपैकी २०१ महिलांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले आहेत. दोघींचे आधार सिडिंग नसल्याने त्यांना आधार सिडिंग करण्यास सांगितले आहे. दिवाळीपूर्वीच पैसे खात्यात जमा झाल्याने महिला या योजनेबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.
- वैशाली सणस, अंगणवाडी सेविका, कारी (ता. भोर)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील तालुक्यातील मंजूर अर्जांपैकी ६ हजार ०३० महिलांचे बँक खाते आधार सिडिंग केलेले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. या महिलांनी ५ आक्टोबरपर्यंत आधार सिडिंग करून घ्यावे. तसेच ज्यांचे आधार सिडिंग झाले आहे, परंतु लाभ मिळाला नाही, त्यांनी टोल फ्री नंबर १८१ वर फोन करावा.
- धनराज गिराम, बालविकास प्रकल्प अधिकारी, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT