पुणे

रायरीत माकडाच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

CD

महुडे, ता.३ : रायरी (ता. भोर) येथील हाता तोंडाशी आलेल्या भात पिकांचे माकडांच्या कळपाने नासधूस केल्याने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या माकडांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे झालेल्या नुकसानीची मागणी केली आहे.
रायरी येथील शेतकऱ्यांचे भात हेच प्रमुख पीक आहे. त्यांचे पिकावर वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असतात. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने भात पिके जोमात आली होती. परंतु गेल्या वर्षभरापासून रायरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या माकडांच्या कळपाने भात पिकाचे नुकसान केले आहे. दहा पंधरा माकडे भात पिकात शिरून भाताला आलेल्या लोंब्या खाऊन टाकत आहे. तसेच माकडांनी पिकात उड्या मारल्या असल्याने भात लोळवले असल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.
वंदना राघू रेणुसे यांचे पंधरा वीस हजारांचे नुकसान झाले असून श्रीकांत रेणुसे, राघू रामचंद्र रेणुसे, किसन देवजी रेणुसे, मारुती भागूजी रेणुसे, देवबा गणपत किंद्रे, विठोबा धोंडिबा किंद्रे, शिवाजी दगडू किंद्रे तसेच गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा. तसेच नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वनविभागाला कळविल्यावर वन विभागाने माकडांना पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. परंतु त्या पिंजऱ्यात माकडे शिरत नसल्याने माकडांचा बंदोबस्त करता येईना. त्यामुळे वनविभागाने योग्य उपाययोजनेसह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
-राजेंद्र किंद्रे, शेतकरी, रायरी

01152

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT