पुणे

महाड-पंढरपूर रस्त्याचे काम थांबविण्याची मागणी

CD

महुडे, ता. ४ : महाड-पंढरपूर रस्त्याचे धोकादायक परिस्थितीत सुरू असलेले काम तत्काळ बंद करण्याची मागणी हिर्डोशी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत मंगळवारी (ता. ४) भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाड-पंढरपूर राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम भोर तालुक्यात सुरू आहे. या मार्गावरील हिर्डोशी, कोंढरी, वारवंड, शिरगाव, वेणुपुरी, देवघर, अशिंपी या गावांच्या ह‌द्दीत धोकादायक पद्धतीने व सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे सूचना व दिशादर्शक फलक लावले नसून, कामासाठी येणारे डंपर व इतर वाहने नंबरप्लेटविना बेदरकारपणे चालवली जातात. १ मार्चला झालेल्या अपघातात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. सात दिवसांत सुरक्षतेच्या दृष्टीने, तसेच रस्ते कामामुळे होणाऱ्या धुळीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीबाबत रहिवासी, शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन कारवाई न केल्यास रस्त्याचे काम बंद पाडले जाईल. हे काम करताना पाणीपुरवठ्याची पाइपलाइन, सांडपाणी वाहिन्या व शेती पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती करून पूर्ववत कराव्यात. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांसोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर बबन मालुसरे, किसन कंक, धोंडिबा मालुसरे, संतोष गोळे, जिजाबा पारठे, विठ्ठल धामुनसे, भगवान ढवळे, रवींद्र मोरे, लक्ष्मण धामुनसे, अरुण मालुसरे, संतोष गोळे यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

Yavatmal Accident: बारा फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळली; दोन शेतकरी गंभीर, बैल ठार, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा आला समोर!

बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Danoli Village Bandh : माणुसकीचा हुंकार! दानोळीत सामाजिक एकोप्याचा स्वर; भरतेशच्या निधनामुळे बौद्ध समाजाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT