पुणे

जीवनावश्यक साहित्य आगीमध्ये जळून खाक

CD

हिर्डोशी, ता.३ : चिखलगाव धोंडेवाडी (ता.भोर) येथील ज्येष्ठ महिला हरुबाई राजाराम आंबवले यांच्या घरास अचानक आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता.२) सायंकाळी घडली. घराच्या छपरावरील वासे, कौले यांसह घरातील धान्य, कपडे, भांडी अशा जीवनावश्यक साहित्यांचे जळून नुकसान झाले.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घरात एकट्याच राहत असलेल्या आंबवले या भात लावणीसाठी शेतात गेल्या होत्या‌. त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पावसातही आगीने रौद्ररूप धारण केल्याने घराचे मोठे नुकसान झाले. असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी महावितरणचा वीजपुरवठा बंद करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. भोर नगरपालिकेचा अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणली.
02118

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT