पुणे

दुर्ग संवर्धन संस्थेतर्फे विद्यार्थिनींना सायकल

CD

हिर्डोशी, ता. २४ : निवंगण (ता. भोर) या हिरडस मावळातील डोंगराळ दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने शिरवली हायस्कूल येथे परिसरातील गावातून शिक्षणासाठी येणाऱ्या कुडली खुर्द, कुडली बुद्रुक, माझेरी, गुढे, निवंगण, पऱ्हर येथील १९ विद्यार्थिनींना सायकल आणि प्राथमिक शाळेतील पहिली ते तिसरीच्या ५० विद्यार्थ्यांना रेनकोट व पुस्तकांचे वाटप मंगळवारी (ता.२२) करण्यात आले. या संस्थेकडून यापूर्वीही या भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी वेळेवर वाहन व्यवस्था नसल्याने पायपीट करत येणारे विद्यार्थी निदर्शनास आल्याने विशेष करून हायस्कूलच्या मुलींची पायपीट कमी होऊन त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये या हेतूने सायकली वाटप करण्यात आले. तसेच मागील काही दिवसांमध्ये संस्थेकडून निवडक विद्यार्थ्यांचे नकळतपणे फोटो घेऊन त्यातून बनवलेले स्केच फोटो देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी दुर्ग संवर्धनचे संदीप खेडेकर, माजी उपसरपंच पांडुरंग दिघे, सामाजिक कार्यकर्ते राजू दिघे, मुख्याध्यापक प्रशांत बनगर, शिक्षक ज्ञानदेव भांडकोळी व पालक उपस्थित होते. या मदतीसाठी राजू दिघे यांनी दुर्ग संवर्धन संस्थेचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT