पुणे

भोरच्या ग्रामीण भागातून हळहळ

CD

हिर्डोशी, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या निधनाची बातमी समजताच भोरच्या ग्रामीण भागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियातून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबरोबरच सर्वपक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा भोर तालुक्यातील प्रचार सर्वच पक्षातील उमेदवारांकडून बंद ठेवण्यात आला, तर भोर शहरात बंद पाळण्यात आला. निवडणूकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुधवारी (ता. २८) होणारा मुंबई, वाशी येथील स्नेहमेळावा रद्द करण्यात आला आहे. पवार यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी १ फेब्रुवारी रोजी भोर शहरात एक व हायवेला एक अशा दोन सभा होणार होत्या. या सभेतून दादा काय बोलणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले असतानाच पवार यांच्या अपघाती निधनाने त्यांचे विचार ऐकण्याची संधी आता भोरकरांना कधीच मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT