पुणे

हिर्डोशीतील यात्रेस आजपासून प्रारंभ

CD

हिर्डोशी, ता. ३० : हिर्डोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री कांगुरमल जोगेश्वरी देवाचा यात्रा उत्सव शनिवार ३१ जानेवारी व रविवार १ फेब्रुवारीला, तर ५३ गावचे दैवत असलेल्या श्री वाघजाई देवीची यात्रा उत्सव माघ पौर्णिमा दिवशी रविवार (ता. १) आणि सोमवार (ता. २) साजरी होत आहे. या दोन्ही यात्रेनिमित्त अभिषेक, आरती, देवाची काठी मिरवणूक, पारंपरिक खेळ, ढोल लेझीम स्पर्धा, छबिना, तमाशा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या दोन्ही यात्रांदरम्यानच्या ढोल लेझीम स्पर्धेसाठी ५ हजार ५५५ रुपये, ४ हजार ४४४ रुपये, ३ हजार ३३३ रुपये, २ हजार २२२ रुपये रुपये अशी अनुक्रमे प्रथम चार क्रमांकांना बक्षीसे व ट्रॉफी देण्यात येणार आहे. वाघजाई देवी यात्रेनिमित्त हिरडस मावळ ५३ गावातून, भोर तालुक्यासह पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी येण्याची परंपरा फार जुनी आहे. आजही भाविक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने यात्रेस उपस्थित असतात. यावर्षी कागुंरमल देवाच्या यात्रेच्या फडा दिवशीच वाघजाई देवीची यात्रा भरत असून, त्यादिवशी रविवार असल्याने भाविकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. दोन्ही यात्रेतील ढोल लेझीम खेळांसाठी जास्तीत जास्त पथकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी हिर्डोशी, तसेच ५३ गाव हिरडस मावळ पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT