पुणे

गिरणी कामगारांचा ''आरपार''चा इशारा

CD

हिर्डोशी, ता.२४ : मुंबईत हक्काची घरे मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. १० मार्चला आझाद मैदानावर मोर्चा काढल्यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास १ मेला मुंबईत ''आरपार''चे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गिरणी कामगार नेते कॉ. उदय भट यांनी दिला आहे.
भोर येथील श्रमिक हॉलमध्ये मंगळवारी (ता. २४) मुंबई गिरणी कामगारांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी कॉ. उदय भट, कॉ. दत्तात्रेय अत्याळकर, कॉ.विठ्ठल करंजे, कॉ. अनंत मालप, कॉ. विठ्ठल टापरे, कॉ. काका जगताप यांनी मार्गदर्शन केले. मुंबईला मोर्चासाठी जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गिरणी कामगार उपस्थित होते. भट म्हणाले की, मुंबईबाहेर घरे देण्याचे सरकारचे धोरण आम्ही हाणून पाडले आहे. मुंबईत जमिनी उपलब्ध असतानाही कामगारांना डावलले जात आहे. आता १४ संघटना एकत्र आल्या असून, विधिमंडळ अधिवेशनावर १० मार्चला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतच पुनर्वसन जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांतून कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सभेत मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT